स्व. भिमसिंग हिरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिर व कर्ज मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By AMAR SHIVAJI PATARE • 2026-07-27 06:41 • 7 views   Share WhatsApp Share Facebook Share X
स्व. भिमसिंग हिरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिर व कर्ज मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्व. भिमसिंग हिरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिर व कर्ज मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे | प्रतिनिधी : अमर पठारे | दि. २५ जुलै २०२६

समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तडफदार सामाजिक युवा कार्यकर्ते जयंत हिरे यांनी त्यांचे पिताश्री स्व. भिमसिंग हिरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबिर व कर्ज मेळाव्याचे आयोजन केले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेत स्व. भिमसिंग हिरे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमाचे संयोजन, प्रास्ताविक, अतिथी स्वागत तसेच समारोप जयंत हिरे यांनी केले. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना, "मन आणि शरीर यांचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच मिळणाऱ्या कर्जाचा योग्य व नियोजनबद्ध वापर करून प्रत्येकाने आपली स्वप्ने साकार करावीत," असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत, विचारवंत व साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर, वसुधा इंटरनॅशनलच्या अध्यक्षा तथा युवा क्रांती संघटना – पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण, माहिती अधिकार संघटनेच्या राष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार वसुधा वैभव नाईक, संतोष डिंबळे, गीतांजली जाधव, जाधवर संस्थेचे डॉ. सुधाकर जाधवर, अलका गुंजाळ, धनंजय देशपांडे, नागेश गायकवाड, विजय वाघमारे, अभिनेते महेश मोरे, पराग रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वसुधा वैभव नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "आपले मानसिक आरोग्य जपा. शरीर अधू झाले तरी मन कधीही अधू होऊ देऊ नका. स्वतःला काय मिळेल यापेक्षा दुसऱ्याला काय देता येईल हा विचार आचरणात आणणारे जयंत हिरे यांचे सामाजिक योगदान समाजासाठी प्रेरणादायी असून अशा उपक्रमांची समाजाला आज मोठी गरज आहे."

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी जयंत हिरे व समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्टचे अभिनंदन करत, अशा समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

AMAR SHIVAJI PATARE 0 followers