EDUCATIONAL NEWS

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

By BALASAHEB RAJENDRA GANGURDE • 2026-09-18 05:00 • 6 views   Share WhatsApp Share Facebook Share X
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या हिंदी विभागाने हिंदी दिवस समारंभाच्या आयोजन केले 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून संपूर्ण भारत देशाबरोबरच अनेक देशांमध्ये मानला जात असताना हिंदी भाषा प्रति प्रेम, जिज्ञासा, आकर्षण वाढविण्यासाठी व १४ सप्टेंबरच्या ऐतिहासिक महत्त्वाची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे करिता महाविद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन केले गेले. त्यामध्ये प्रामुख्याने काव्यवाचन, गीत गायन, वक्तृत्व, निबंध, भितीपत्र, स्पर्धेचे आयोजन केले यामध्ये जुनियर व सीनियर विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे व प्रमुख अतिथी डॉ. प्रमोद परदेशी यांनी पुस्तक व प्रमाणपत्र प्रदान केले.

दिनांक 16/09/2026 रोजी हिंदी दिवस समारंभ घेण्यात आला. याचे प्रमुख पाहुणे दादा पाटील महाविद्यालयाचे हिंदी विभागा ध्यक्ष डॉ. प्रमोद परदेशी हे होते व अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाशजी साळवे होते प्रमुख पाहुणे डॉक्टर परदेशी यांनी 14 सप्टेंबर चे महत्व व राजभाषा राजभाषा राष्ट्रभाषा व आंतरराष्ट्रीय भाषा याबाबतचे मार्गदर्शन केले. यामध्ये हिंदी अनेक भारतीय भाषांमध्ये प्रमुख व आदर्श मानक भाषा समजून तिला स्वीकृती कशी दिली गेली. याची सोदाहरण मांडणी करून "हिंदी भाषा व रोजगार संधी" या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला. अध्यक्ष मनोगत मध्ये प्राचार्य डॉ. प्रकाशजी साळवे साहेब यांनी भारतीय सामाजिक धार्मिक या सांस्कृतिक परिस्थिती सुधार मध्ये हिंदी भाषेचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे मत प्रकट केले. पाहुण्याचा परिचय हिंदी विभागाध्यक्ष डॉ राजाराम कानडे यांनी करून दिला तर हिंदी भाषेचे आजचे स्वरूप व योगदान विषयक भूमिका मांडण्याचा प्रयत्न संयोजक डॉ.देवेंद्र बहिरम यांनी केला, प्रमाणपत्र वितरण प्रा. बापू मांडे यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रा. संजय फटे यांनी मानले या प्रसंगी प्रा. बापू मांडे यांचे प्रकाशित पुस्तक "सुलभ हिंदी व्याकरण" स्पर्धक विजेते विद्यार्थ्यांना प्रदान केले गेले या समारंभात समन्वयक डॉ. राहुल गायकवाड उप्रा चार्य डॉ. सुदाम भुजबळ, प्रा श्रीकांत थोरात,प्रा. रमेश थोरात, डॉ. सुप्रिया पवार, डॉ.रावसाहेब काळे, प्रा. मनीषा रायकर डॉ. अर्चना फुलारी, प्रा. सिद्धार्थ बर्वे, प्रा. नाना वागस्कर,प्रा. निलेश सोनवणे, प्रा. मगर, प्रा. चव्हाण, प्रा. राजेंद्र वाघ इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमात उस्फुर्त मनोगत व्यक्त करणारे दहा विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आपला आत्मविश्वास दाखवला. रांगोळी, भितीपत्र, सूत्रसंचालन हॉल सजावट मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हम होंगे कामयाब या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली विद्यार्थिनीचे कौतुक मान्यवर- अतिथीकडून झाले सर्व विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात झाला.
सदर कार्यक्रम सकाळी ठीक अकरा वाजता आरंभ होऊन तो साडेअकरा वाजता संपन्न झाला उपस्थित विद्यार्थी एकूण 105 होते. ज्युनिअर चे 50 व सिनियरचे 55 या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

#MJS College Shrigonda
BALASAHEB RAJENDRA GANGURDE 0 followers