April 30, 2026

जनगणना २०२७ तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेस सुरुवात* (नागरिकांना करता येणार स्व- गणना)

अमरदीप दगडे (जिल्हा प्रतिनिधी):
नांदेड (२६ मार्च): जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे, राष्ट्राच्या सर्वांगीण विकास- नियोजनासाठी जनगणनेचा संकलित विदा (डेटा) आधारभूत ठरतो.त्यामुळे जनगणना कार्यक्रमात सहभागी प्रत्येक घटकाने नेमून दिलेली जबाबदारी अचूकपणे पार आवश्यक असल्याचे सांगितले.तसेच तंत्र स्नेही व कार्यक्षम अधिकारी- कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग घेऊन विहित मुदतीत प्रक्रिया पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश जिल्‍हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डीले यांनी यावेळी दिले. जनगणना २०२७ च्‍या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
सन २०२७ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणना अनुषंगाने प्रशासकीय तयारी झाली आहे. जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत गुरुवार दिनांक 26 रोजी कै. डॉ.शंकरराव चव्हाण नियोजनभवन येथे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनगणना संचा लनालयाचे सहायक संचालक वीरेंद्र दीक्षित , सांख्यिकी अधिकारी मयुर पवार, नेहाल धुरंधरे यांनी जनगणनेची पार्श्वभूमी, प्रक्रिया, संकल्पना याबाबत संगणकीय सादरीकरण, दृकश्राव्य चित्रफित माध्यमातून माहिती दिली.जनगणना कामाचा पाया तयार करणे ,जनगणना अधिकारी कर्मचारी यांची भूमिका तसेच प्रथम टप्प्यात करण्यात येणाऱ्या घर यादी तसेच भरावयाचे 34 मुद्दे इत्यादीबाबत प्रश्‍नोत्‍तराच्‍या माध्‍यमातून सहज सोप्या पध्‍दतीने प्रशिक्षण दिले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी झेनिथचंद्रा दोनथुला, अनन्या रेड्डी, निवासी उपजिल्‍हाधिकारी किरण अंबेकर, मनपा उपायुक्त अभिजीत वायकोस, तहसिलदार विपीन पाटील यांचेसह सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसिलदार, न.प.मुख्‍याधिकारी, तंत्र सहायक, तसेच जनगणनेशी संबंधित विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
चौकट..( यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी जनगणना कामाचे प्राधान्य अधोरेखित केले. जनगणना दोन टप्प्यात होत असून प्रथम टप्प्यात घरयादी व गणना,तर दुसऱ्या लोकसंख्येची गणना होणार आहे.16 मे ते 15 जून या कालावधीत प्रगणक गृहभेटी देऊन माहिती संकलित करतील. असे असले तरी *01 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना स्व – गणना करण्याची सुविधा* उपलब्ध असणार आहे.नागरिक आपली माहितीमोबाईल च्या माध्यमातून संकेतस्थळावर भरू शकतील. पहिल्यांदाच अद्ययावत डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने जनगणना होत आहे. नागरिकांनी प्रगणकाना जनगणना अनुषंगाने आवश्यक अचूक माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP ASHOKARAO DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION