May 6, 2026

जय भवानी ट्रस्ट,शिरूर अंगारकी चतुर्थी निमित्त श्री गणपती महाआरती चे कार्यक्रम.


  • पुणे जिल्हा रिपोर्टर पाच मे 2026 रोजी मंगळवार असल्याने या दिवसाला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. इतर चतुर्थीच्या तुलनेत अंगारकी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक फळ मिळते ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास करून गणपती पूजा करावी. यामुळे मंगळ दोष दूर होतो याशिवाय अंगारकी चतुर्थीचा उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.आणि इच्छा पूर्ण होतात. काची आळी परिसरातील जय भवानी ट्रस्ट, शिरूर उपाध्यक्ष श्री. अमितजी शरद मल्लाव व सामाजिक कार्यकर्ते श्री. शंतनू भैया मल्लाव व भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल जी मल्लाव व पुणे जिल्हाध्यक्ष / कोषाध्यक्ष श्री. लक्ष्मण जी मल्लाव
    शिरूर तालुका युवा मोर्चा श्री. सचिन जी मल्लाव, शिरूर तालुका कार्याध्यक्ष श्री. करण जी मल्लाव, व शिरूर तालुका उपसरचिटणीस श्री. शेखर जी कनिच्छे, व इतर जय भवानी ट्रस्ट शिरूर सदस्य व पदाधिकारी गणेश भक्तांनी आणि मित्र मंडळांनी मोठ्या उत्साहात अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली. भक्तांसाठी महाप्रसाद आणि विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
Written by

ANIL DIVANJI MALLAV

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION