पुणे: शिरूर पोलीस निरीक्षक श्री. विनोद भगवान पाटील यांची भारतीय जनवादी पार्टी यांची जनहित भेट

पुणे: शिरूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री. विनोद भगवान पाटील यांची विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या.
भेटीदरम्यान शिरूर शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच जनतेशी सुसंवाद राखण्याबाबत चर्चा झाली. उपस्थितांनी श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरूर परिसरात शांतता, सुव्यवस्था आणि पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भारतीय जनवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल दिवाणजी मल्लाव, पुणे जिल्हाध्यक्ष/कोषाध्यक्ष श्री. लक्ष्मण शरद मल्लाव आणि तालुका कोषाध्यक्ष श्री. रोहित राजू मल्लाव सहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.