April 14, 2026

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त भारतीय जनवादी पार्टी तर्फ स्तंभला पूजन

पुणे जिल्हा रिपोर्टर. शिरूर शहरांमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय न्यायशास्त्र अर्थशास्त्रज्ञ राजनीतिज्ञ तत्वज्ञान समाज सुधारक पत्रकार,वकील,दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुजीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती 14 एप्रिल 1891 रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला प्रचंड बुद्धिमत्ता समाजासाठी असीम त्याग करणारे दलित समाजाला हक्क मिळवून देणारे महाडचा सत्याग्रह मनुस्मृतीचे दहन मंदिर सत्याग्रह शेतकऱ्याचा कैवारी गोलमेज परिषद पुणे करार स्वतंत्र मजूर पक्ष बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना दलित शिक्षण संस्थेची स्थापना पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना महिलांसाठी कार्य स्वतंत्र लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात गेल्या समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची समाजामध्ये घातले तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला शिक्षणासाठी समाजाच्या शिक्षण कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र दिला असामान्य कर्तृत्व वाढवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा अगदी थोडक्यात आढावा. मध्यप्रदेशातील मोहोळ येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भिमाबाई असे होते मध्यप्रदेशानंतर काही काळ दापोली सातारा येथे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. बाबासाहेब ने शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले वयाच्या 14 व 15 वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झाला बाबासाहेब आपल्या शाळेत शिक्षणात 18 तास अभ्यास करीत असत मॅट्रिक परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांनी मुंबई विद्यापीठातून बीएची पदवी घेतली बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने बाबासाहेब उच्च शिक्षण साठी अमेरिकेत गेले. कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात l पदवी संपादन केली त्यानंतर याच विषयात डॉक्टरेट मिळवली परदेशातील विद्यापीठातून अर्थशास्त्रज्ञ पदवी संपादन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले भारतीय होते. बाबासाहेबांनी दोन विषयात पीएचडी मिळवली. आणि डी एस सी पदवी घेतली. ग्रेज इन इथून बॅरिस्टर ऍक्ट लॉ स्टडी घेऊन तीन एप्रिल 1923 रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजणांसाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीच्या काळात बाबासाहेब उत्तम प्रकारे वकील की १९२० मध्ये बाबासाहेबानी मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पान वठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता.त्यामुळे अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेब यांनी महाड येथे पिण्याचे पाण्यासाठी सत्याग्रह करण्याची ठरवले बाबासाहेब आंबेडकर 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे बहिष्कृत हित कारणी सभेची स्थापना केली. सामाजिक व राजकीय दृष्ट्या तळागाळात फेकले गेलेयांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे.सभेचे ध्येय होते हिंदू असूनही आणि त्यांना मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी अमरावती येथील प्राचीन अंबाबाई मंदिरात पुण्यातील पर्वती मंदिरात नाशिक येथील काळाराम मंदिरात बाबासाहेबांनी मंदिर सत्याग्रह केला शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील.आर्थिक विषमता जितके कमी होईल तितकी साथी भेदभावाची दरी कमी होईल असे बाबासाहेबांना वाटत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात महत्त्वाची संकल्पना मांडली ती शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याची पीक पद्धती पाणी उपलब्धता बांध बंदिस्ती, उत्पादकता वाढ साठवण व्यवस्था शेतमालाची विक्री शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत.असे त्यांचे स्पष्ट मत होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा सावकारी व खोती पद्धतीचा प्रतिबंध करणारा कायदा सामूहिक शेतीचे प्रणालीकरण आधारित शेती महामंडळ राज्यातील नद्यांच्या पोरांची विभागणी व विकास जलसंवर्धन योजना अमलात आल्या शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले या मागे डॉ. बाबासाहेब यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो डॉ.बाबासाहेब आंबेडकर समग्र पीडित शोषित व दलितांचे प्रतिनिधी म्हणून लंडनच्या तिन्हीही गोलमेज परिषदांना हजर राहिले. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यांचे हित संरक्षण करण्याच्या हेतूने त्यांनी इंडियन राऊंड टेबल कॉन्फरन्सला मागण्या सादर केल्या इ. स.1920 च्या दशकाच्या अखेरीस संघ डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे राजकीय नेते बनले होते. इ. स. 1932 रोजी ब्रिटिश मंत्रिमंडळाने मंजूर करून घेतला त्या वर मंत्रिमंडळाने शिक्का मार्तंब केले.मजुरांना कामगारांना हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी स्पेशल 1936 मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. बहिष्कृत हितकारणी सेवेची स्थापना, दलित शिक्षक संस्थेची स्थापना पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शिक्षणाची दारे खुली केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्री मुक्तीचे पक्के समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांचे शिकवणीचा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा प्रवाह होता ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कार होते स्वतंत्र भारताची पहिले कायदा मंत्री असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानात सिंहाचा वाटप होता.एवढे सूक्ष्म निरीक्षण असणारे आणि कोणावरी अन्याय न करता सर्वांना समान हक्क अधिकार देणाऱ्या बाबासाहेबांचे असामान्य बुद्धीची प्रचिती संविधानाच्या वाचनावरून येतेच. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र झटक होते हिंदू धर्मात आपल्याला समतेची वागणूक देण्यात यावी. यासाठी त्यांनी मोठा लढा दिला शेवटी हिंदू धर्म त्यागाचा म्हणजेच धर्मांतराचा निर्णय घेईल तिथला हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणत्या धर्माचा स्वीकार करायचा याबद्दल बाबासाहेबानी सफल विचार केला.हजार कार्यकर्त्यांचा बाबासाहेब ना पाठिंबा होता अखेर बौद्ध धर्माचा बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकार केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अध्यक्षतेखाली दोन मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील /प्रतिनिधी भिकू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा सामुदाय ही उपस्थित होता मार्च 1959 च्या एका अहवालानुसार देशात 1.5 ते दोन कोटी अस्पृश्यतांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. या घटनेची जागतिक इतिहासात नोंद झाली तर या घटनेने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित झाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर देशात ऐतिहासिक होते कारण ते जगातील सर्वात मोठे सामायिक धर्मांतर होते नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्माचक्र पुन्हा एकदा मतिमंद झालेले पाहून बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. 20 नोव्हेंबर 1956 मध्ये नेपाळमधील काठमांडूला वर्ल्ड फेमस ऑफ उद्दिष्ट च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारस मध्ये दोन भाषणे दिली दिल्लीमध्ये त्यांनी विविध बौद्ध समारंभास भाग घेतला राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या भगवान बुद्ध आणि कारमाच या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले.6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. शिरूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस भारतीय जनवादी पार्टी चे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल मल्लाव व भारतीय जनवादी पार्टी प्रदेश महासचिव श्री मनाजी बोऱ्हाडे, महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव श्री योगेश डोळस, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी समिती श्री बबनराव कनिच्छे, पुणे जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण मल्लाव शिरूर तालुका उपसरचिटणीस श्री शेखर कनिच्छे व सदस्य श्री. रुपेश हुडे यावेळी पुष्पहार करताना कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीमधील अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे व सर्व पत्रकार बांधवांचे व पोलीस कर्मचाऱ्यांचे यावेळी भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आभार मानले. जमलेल्या सर्व भीमसैनिकांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा… 💐💐💐💐💐💐💐💐💐 जय हिंद…… जय भारत जय संविधान

Written by

ANIL DIVANJI MALLAV

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION