विलास केजरकर, भंडारा
भंडारा : भोजापुर येथे आयोजित सभेत आजाद समाज पार्टी (कांशीराम) पक्षाची शाखा गठित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी विदर्भ सचिव ग्यानचंद जांभुळकर होते. यावेळी जिल्हा सचिव डॉ. रवींद्र जनबंधू, अमोल भिवगडे तसेच मीडिया प्रमुख नितेश गानार उपस्थित होते.
सभेत बोलताना ग्यानचंद जांभुळकर यांनी फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीवर भाष्य केले. त्यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार Chandrashekhar Azad यांच्या कार्याचा उल्लेख करत सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या मुद्द्यांवर पक्ष कार्यरत असल्याचे सांगितले.
अमोल भिवगडे यांनी युवकांनी सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर संघटित होण्याचे आवाहन केले. डॉ. रवींद्र जनबंधू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांचा उल्लेख केला.
सभेला मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. यावेळी प्रलय जयपाल सुखदेव यांची ग्राम शाखा भोजापुर अध्यक्षपदी, राहुल सिद्धार्थ नागदेवे यांची सचिवपदी तसेच दिनेश जयचंद हुमणे यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. इतर कार्यकारिणी सदस्यांची घोषणा पुढील बैठकीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नितेश गानार यांनी केले.