June 21, 2026

भौगोलिक आश्चर्य: आज वर्षातील सर्वात मोठा दिवस; २१ जून योग दिन

आज, २१ जून रोजी उत्तर गोलार्धात एक विशेष भौगोलिक घटना घडत आहे. आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असून, आजची रात्र सर्वात लहान असणार आहे. खगोलशास्त्रात या दिवसाला ‘उन्हाळा अयनांत’ (Summer Solstice) म्हणून ओळखले जाते.

पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे 23.5 अंश कोनात कललेली आहे. २१ जून रोजी पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने सर्वाधिक झुकलेला असतो. त्यामुळे सूर्यकिरणे कर्कवृत्तावर जवळपास लंबरूप पडतात. या स्थितीमुळे भारतासह उत्तर गोलार्धातील देशांना वर्षातील सर्वाधिक काळ सूर्यप्रकाश मिळतो. परिणामी आज दिवस मोठा आणि रात्र लहान असते.

या दिवसानंतर हळूहळू दिवसाचा कालावधी कमी होत जातो आणि रात्रीचा कालावधी वाढू लागतो.

या दिवसाचे महत्त्व केवळ भूगोलापुरते मर्यादित नाही. या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिनही विविध कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो.

२०१५ पासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्यामुळे विविध संस्था, शैक्षणिक केंद्रे आणि सामाजिक संघटनांमार्फत योगाचे महत्त्व अधोरेखित करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात.

SANTOSH SURESH JAVARE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION