May 3, 2026

सुनील राणे यांची नांदेड येथील ‘भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ उपक्रमाला भेट

भाजप आमदार सुनील राणे यांनी नांदेड येथे सुरू असलेल्या “भाऊचा माणुसकीचा फ्रिज” या सामाजिक उपक्रमाला भेट दिली. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना विनामूल्य अन्नपॅकेट उपलब्ध करून दिले जाते. आयोजकांच्या माहितीनुसार दररोज सुमारे ४० ते १२० जेवणाचे डबे येथे ठेवले जातात, जे कोणतीही अट न ठेवता गरजूंना उपलब्ध होतात.

कोरोना काळात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. शहरात कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये आणि अन्न वाया जाऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे. याशिवाय हिवाळ्यात ब्लॅंकेट, पावसाळ्यात छत्र्या आणि उन्हाळ्यात चपला यांचे वाटपही केले जाते.

दिवाळीसारख्या सणांच्या काळात गरजू कुटुंबांना मिठाईचे वाटपही केले जाते, अशी माहिती आयोजकांनी दिली.

यावेळी सुनील राणे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजातील गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या कार्याचे स्वागत केले.

कार्यक्रमादरम्यान गरजूंना अन्नपॅकेटचे वाटपही करण्यात आले.

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION