CRIME NEWS

नानीबाई चिखलीत प्रेशर मीडचा वापर; चौघांवर गुन्हा ट्रॅक्टर ट्रॉली बेस आणि टॉप असं वीस लाखाचा बुद्धिमान शब्द

By SAMEER JEEVANRAO KATAKE • 2026-09-16 04:58 • 5 views   Share WhatsApp Share Facebook Share X
नानीबाई चिखलीत प्रेशर मीडचा वापर; चौघांवर गुन्हा  ट्रॅक्टर ट्रॉली बेस आणि टॉप असं वीस लाखाचा बुद्धिमान शब्द

नानीबाई चिखलीत प्रेशर मीडचा वापर; चौघांवर गुन्हा
ट्रॅक्टर ट्रॉली बेस आणि टॉप असं वीस लाखाचा बुद्धिमान शब्द

कोल्हापूर : प्रतिनिधी

नानीबाई चिखली (ता. कागल) येथे गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी साऊंड सिस्टीममध्ये प्रेशर मीडचा वापर केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानीबाई चिखली येथील गणेश मंदिर चौकात १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते ७.५० या वेळेत नृसिंह तरुण मंडळाची गणेश आगमन मिरवणूक सुरू होती. यावेळी डॉल्बीमध्ये प्रेशर मीडचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी काढलेल्या आदेशाची अवज्ञा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी गंगाराम भाऊसो खोंद्रे, विजय आण्णासो गोनुगडे, नंदकुमार दत्तात्रय घाटगे आणि रोहित महादेव पोवार (सर्व रा. नानीबाई चिखली, ता. कागल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या कारवाईत सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सुमारे १० लाख रुपये किमतीचा महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर (आरटीओ क्रमांक MH 09 HE 5294) व त्याला जोडलेली डंपिंग ट्रॉली, तसेच सुमारे १० लाख रुपये किमतीची व्ही.एम. कंपनीची दोन बेस व दोन टॉप प्रेशर मीड असलेली साऊंड सिस्टीम आणि चार अॅम्प्लिफायर यांचा समावेश आहे.

या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील बंडू देसाई यांनी फिर्याद दिली. गुन्ह्याचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल पाटील करीत आहेत.

##कोल्हापूर #ध्वनिप्रदूषण
SAMEER JEEVANRAO KATAKE 0 followers