April 20, 2026

उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेत बदलाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेत बदलाची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

विलास केजरकर भंडारा.

भंडारा : – सध्या वाढत्या उन्हामुळे लहान मुलांना शाळेत जाताना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काही पालकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शाळेच्या वेळा कमी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून सकाळच्या सत्रात शाळा घेणे किंवा वेळेत बदल करणे अत्यावश्यक असल्याचे पालकांनी सांगितले. विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली.
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागासोबत लवकरच बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळामध्ये शैलजा वाघ, दांदळे, चेतन भैरम, प्रमोद केसलकर, चंद्रकांत श्रीकोंडावार, चंद्रशेखर भिवगडे, प्रवीण मेहर यांच्यासह इतर पालकांचा समावेश होता.
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION