April 28, 2026

शिरूर मधील 1751अ/1211 या भागातील अतिक्रमण नियमानुकुल करण्याचे आदेश.

पुणे जिल्हा रिपोर्टर.

अनेक वर्षापासून अतिक्रमण केलेल्या जागेत राहतात पण त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता या लोकांचे अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना जागा नावे करून मिळावी.अशी मागणी भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अनिल मल्लाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महसूल शाखा या ठिकाणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेतील चार सदस्य समिती स्थापन करून त्यात उपविभागीय अधिकारी उपविभाग पुणे, शिरूर हे अध्यक्ष स्थानी व शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सदस्य सचिव, नगररचना सदस्य व भूमि अभिलेख सदस्य समिती सर्व अहवाल आल्यानंतर अतिक्रमण धारकांचा प्रश्न मार्गी लागेल. शिरूर नगरपरिषद ला गट नंबर 1751/अ मधील श्री. अनिल दिवाणजी मल्लाव

व गट नं. 1211 मधील श्री. भरत महादेव वाळके शिरूर प्रशासनाकडं आदेश साठी प्रस्ताव प्रलंबित असून शिरूर नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. असा आरोप करण्यात आला आहे राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाचा निर्णय तसेच महसूल व वन विभागाच्या ताज्या शासन निर्णय नुसार अतिक्रमणकाच्या नियमानुकूल करण्याची स्पष्ट तरतूद असूनही स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा संताप भारतीय जनवादी पार्टी यांनी व्यक्त केला.

Encroachment In Shirur याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.निवेदन देताना भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल मल्लाव व पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मण शरद मल्लाव हे उपस्थित होते.

Written by

ANIL DIVANJI MALLAV

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION