April 20, 2026

आझाद समाज पार्टी (कांशीराम) च्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

आझाद समाज पार्टी (कांशीराम) च्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- आझाद समाज पार्टी (कांशीराम) च्या वतीने महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्रिमृर्ती चौक येथे अभिवादन व आमगाव येथील बालगृह अनाथालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांनी फळवाटप करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्व विदर्भ सचिव तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष ग्यानचंद जांभूळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अनाथाश्रमाचे सुपरवायझर सुखदेवे, जिल्हा महासचिव अश्विन गोस्वामी, संतोष उकणकर, जिल्हा सचिव अमोल भिवगडे, डॉ. रविंद्र जनबंधू, भंडारा तालुका अध्यक्ष युगांतर मेश्राम, भंडारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नितेश गाणार, महेश गणवीर, अशोक नंदेश्वर, शुभम मडामे, पप्पू सुखदेवे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी त्रिमूर्ती चौक येथे मठ्ठा वाटप व आमगाव येथील बालगृह अनाथालयातील विद्यार्थ्यांना फळवाटपाचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी ग्यानचंद जांभूळकर म्हणाले की, संसदेमध्ये एससी, एसटी व ओबीसी समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे एकमेव खासदार म्हणजे अ‍ॅड. भाई चंद्रशेखर आझादी (नगीना, उत्तर प्रदेश) आहेत. त्यामुळे आपल्या पुढील पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने आझाद समाज पार्टीमध्ये सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही कमजोर किंवा एकटे समजू नका, जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, अनेकांनी प्रतिकूल परिस्थितीतून यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले.
यावेळी पप्पू सुखदेवे यांचा आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांना नियुक्ती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश गाणार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ. रविंद्र जनबंधू यांनी मानले.
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION