बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी समोर यावे – अशोक बेलेकर
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- टू जस्टीस व इंडियन वेल्फेअर सोसायटी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने अक्षय तृतीया निमित्त भंडारा जिल्ह्यामध्ये बालविवाह मुक्त अभियान राबवण्यात आले. या अभियानाचे सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात सुरूवात करण्यात आली असून आज तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाहणी, चांदपूर व सिलेगाव येथे जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडियन वेल्फेअर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक अमोल पाणतावने व विविध गावांतील महिला, विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रम टू जस्टीस व इंडियन वेल्फेअर सोसायटी भंडारा जिल्हा समन्वयक अमोल पाणतावने यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती करण्यात आली त्याच प्रकारे लोकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाहणी, चांदपूर व सिलेगाव येथे जनजागृती रॅली काढुन विविध घोषणा देण्यात आल्या.
इंडियन वेल्फेअर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर यांनी ग्रामवासियांना शासकीय योजना व गावाच्या विकासासाठी जागृत नागरिकांनी परिसरात होत असलेल्या बालविवाह रोखण्याकरिता सातत्याने
प्रयत्न करावे. असे मार्मिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्ण प्रकाश कुथेकर व प्रास्ताविक दीपमाला भालेराव यांनी केले तर उपस्थितांचे हर्ष चव्हाण आभार प्रदर्शन वैद्य सर आणि गावातील समस्त ग्रामवासी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्ष चव्हाण व विविध गावांतील महिला बचत गट, विद्यार्थी- विद्यार्थिनींनी व समस्त ग्रामवासी यांनी सहकार्य केले.
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*