May 18, 2026

कुंडलवाडीत 20 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा; भव्य व्याख्यान, गुणवंत विद्यार्थी आणि पत्रकारांचा होणार सत्कार

कुंडलवाडी:
येथील छावा मराठा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त भव्य जन्मोत्सव सोहळा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. २० मे रोजी सायंकाळी ६:३० वाजता शहरातील के. रामलू मंगल कार्यालयात संपन्न होणार असून, याप्रसंगी ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज: काल, आज आणि उद्या’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्यात्या तथा जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या डॉ. भारती मढवई यांचे मुख्य व्याख्यान होणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई गजानन कोटलावार भूषवणार आहेत. तसेच या मंगलप्रसंगी नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि स्थानिक पत्रकारांचा छावा मराठा संघटनेच्या वतीने विशेष गौरव व सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती छावा संघटनेचे शहराध्यक्ष प्रा. डॉ. माधव हळदेकर यांनी दिली आहे.
​या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष इंजि. तानाजी हुस्सेकर, संघटक प्राचार्य डॉ. कमलाकर कनसे, प्रवक्ते डॉ. प्रभाकर जाधव आणि जिल्हाध्यक्ष इंजि. प्रवीण जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्षा सौ. नेहा ऱ्याकावार, सोसायटी चेअरमन सुनिल बेजगमवार, माजी सोसायटी चेअरमन साईनाथ उत्तरवार, माजी उपनगराध्यक्ष डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार, राजेश्वरराव उत्तरवार, दिनेश दाचावार, धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह कुंडलवाडी शहरातील सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळ्याचा आणि व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी बिलोली, धर्माबाद तसेच कुंडलवाडी शहर व परिसरातील पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी आणि शिव-शंभू भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष प्रा. डॉ. माधव हळदेकर व संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

AMARDEEP A DAGDE

AMARDEEP ASHOKARAO DAGDE

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION