June 10, 2026

३१ मे रोजी नागपूर विभागीय मराठा महासंघाचा वधू-वर परिचय मेळावा

भंडारा : मराठा समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींचे विवाह जुळविण्यासाठी कार्यरत असलेल्या स्व. शरदराव भोसले आणि स्व. सतीशजी गिरमकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागपूर विभाग मराठा महासंघातर्फे मराठा समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींसाठी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा रविवार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सक्करदरा चौक, नागपूर येथे होणार आहे.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे अध्यक्ष तसेच नागपूरच्या भोसले राजघराण्याचे श्रीमंत मुधोजीराजे भोसले राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, विरान डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर व मविप्र समाजाचे माजी कार्याध्यक्ष दिलीपराव चव्हाण तसेच नवनिर्वाचित नगरसेवक सचिन नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

नागपूर विभाग मराठा महासंघाकडे प्राप्त माहितीनुसार तयार करण्यात आलेल्या वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच मंचावर येऊन स्वतःचा परिचय देणाऱ्या विवाहयोग्य युवक-युवतींचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हा परिचय मेळावा विनामूल्य असून मराठा समाजातील युवक-युवती, पालक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर विभागीय अध्यक्ष नरेंद्र मोहिते, संजय मोहिते, भंडारा जिल्हाध्यक्ष तसेच महिला अध्यक्षा मंगला कोल्हे यांनी केले आहे.

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION