जैन प्रकोष्ठाच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर
जैन प्रकोष्ठाच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर
*कराड* - भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. सचिन दोशी यांच्या वतीने, भाजपा चे सातारा जिल्हाध्यक्ष मा. आमदार श्री. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणीतील विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात जैन समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, समाजातील नागरिकांना संघटित करणे तसेच सामाजिक उपक्रमांना चालना देणे हा या नियुक्त्यांमागील प्रमुख उद्देश आहे.
जैन प्रकोष्ठच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीमध्ये सातारा शहरासाठी महेश सुमतीलाल शहा, वाईसाठी प्रितम रमेश ओसवाल, कोरेगावसाठी प्रितम सुरेश शहा, कराड उत्तरसाठी हिमांशु प्रमोद शहा, कराड दक्षिणसाठी मनीष अजमेरा, माण-खटावसाठी राजुभाई सुमतीलाल शहा, फलटणसाठी राहुल सूर्यकांत शहा आणि पाटणसाठी शांतिभूषण यू. कटारिया यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, सातारा शहर जैन प्रकोष्ठच्या बाह्य मंडल अध्यक्षपदी जयेश उमेदमल मुथा, सहसंयोजकपदी विरेंद्र ओसवाल, मध्य मंडल अध्यक्षपदी कुशल महावीर बोरा आणि मध्य मंडल सहसंयोजकपदी नरेंद्र एल. गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला विभागात जैन प्रकोष्ठच्या जिल्हा महिला संयोजकपदी सौ. गीता नितीन रणदिवे, तर महिला सहसंयोजकपदी सौ. वृषाली शीतलकुमार दोशी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे सातारा जिल्ह्यात जैन प्रकोष्ठचे संघटन अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे. नवनियुक्त पदाधिकारी जिल्ह्यातील विविध भागांत समाजहिताचे उपक्रम राबविण्यासह संघटनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
दरम्यान, सातारा शहरातील जैन प्रकोष्ठच्या इतर नियुक्त्याही मा. आमदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.