परळी नगरपरिषद सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा; नगरसेवक नितीन बागवाले यांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
परळी वैजनाथ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवार, 30 एप्रिल रोजी नगराध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सभेदरम्यान नगरसेवक नितीन बागवाले यांनी विविध प्रशासकीय मुद्द्यांवर लक्ष वेधले. त्यांनी अग्निशमन विभागाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्न उपस्थित करत, काही आगीच्या घटनांमध्ये प्रतिसाद वेळेबाबत चिंता व्यक्त केली.
तसेच अंबेवेस येथील सरस्वती नदीवरील पुलाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले. या संदर्भात सभेत चर्चा झाली.
याशिवाय शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेबाबतही त्यांनी मुद्दा उपस्थित करत, कारवाई सर्वांसाठी समान आणि निष्पक्ष असावी, अशी भूमिका मांडली. काही ठिकाणी कारवाई होत असताना इतर ठिकाणी अतिक्रमण कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.
या मुद्द्यांवर सभागृहात काही काळ चर्चा रंगली. संबंधित अधिकाऱ्यांकडून या विषयांवर पुढील कार्यवाही अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.