दि. १८ मे २०२६ रोजी दै. वीर शिरोमणी आणि दै. नंदगिरीचा कानोसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा. जालिंदर वाहूळ यांना “मूकनायक” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला नामदार Hemant Patil, साध्वी धर्मसिंहनी गायत्री दीदी, संस्कृती संवर्धन मंडळाचे प्रकल्प संचालक रोहित देशमुख, शिवा कांबळे, दै. वीर शिरोमणीचे मुख्य संपादक शंकरसिंग ठाकूर, तसेच दै. नंदगिरीचा कानोसाचे मुख्य संपादक मारुती शिकारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रा. जालिंदर वाहूळ हे मागील तेरा वर्षांपासून राजश्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय, सगरोळी येथे जीवशास्त्र विषयाचे अध्यापन करत आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख असून, मुप्टा शिक्षक संघटनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे.
त्यांच्या शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांना “मूकनायक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना प्रा. वाहूळ यांनी आयोजक संस्था आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी प्रा. वाहूळ यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.