50 लाखाला पेपर विकत घेतला, मुलांना घरी रटायला लावला, मुलं शारिरीक चाचणीत नापास
नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
*ब्राह्मण समूदायातील लोक* नेहमीच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांमध्ये मेरिट नसल्याचा ढोल बडवतात. मात्र एका प्रकरणात आता त्यांच्यातच मेरिट नसल्याचा खुलासा झाला आहे. खरं तर राजस्थाममध्ये एका अधिकार्याने आपल्या मुलांसाठी सब इस्पेक्टर (एसआय) भरतीचा पेपर 50 रूपयांना विकत घेतला. घरी जावून मुलांना पाठ करायला लावला. परीक्षेत चारही मुलं पास झालीत. मात्र शारीरिक चाचणी मुलं नापास झाली. या प्रकरणात अधिकारी लोकेंद्र पंड्या आणि त्यांच्या मुलांना अटक केली आहे.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, राजस्थानमधील पोलीस उपनिरीक्षक (एसआय) भरती परीक्षा 2021 पेपर लोकेंद्र पंड्या याचा भाऊ, कुंदन पंड्या याने आरपीएससीचे माजी सदस्य बाबूलाल कटारा यांच्याकडून अंदाजे 50 लाख रुपयांना खरेदी केला होता. कुंदन पंड्या हा मूळचा डुंगरपूरच्या सागवारा भागातील आहे. या प्रकरणात यापूर्वी 2025 मध्ये कुंदन पंड्या त्याची मुलगी रिद्धी पंड्या, लोकेंद्र पंड्या याची मुलगी नेहा पंड्य आणि मुलगा नैतिक पंड्या यांना अटक करण्यात आली होती.
या पेपर फुटी प्रकरणात राजस्थान स्टेट बेवरेजेस कॉर्पाेरेशन लिमिटेडच्या (आरएसबीसीएल) डेपो व्यवस्थापक लोकेंद्र पंड्या याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. पथकाने डुंगरपूर जिल्ह्यातील वरदा गावातील त्याच्या घरातून लोकेंद्र पंड्याला अटक करण्यात आली. लोकेंद्रला न्यायालयात हजर केले असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आणि संपूर्ण नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी त्याची सतत चौकशी सुरू आहे.
एडीजी (एसओजी) विशाल बन्सल यांच्या म्हणण्यानुसार, बाबूलाल कटाराने सर्व परीक्षेचे पेपर्स कुंदन पंड्याला दिले होते. त्यानंतर कुंदन पंड्या याने ते पेपर आपला भाऊ लोकेंद्र पंड्या याला दिले. लोकेंद्रने ते पेपर त्याचा मुलगा नैतिक, मुलगी नेहा पंड्या आणि भाची रिद्धी पंड्या यांना परीक्षेपूर्वी ते पेपर पाठ करायला दिले.
असे वृत्त आहे की, तयारी पूर्ण झाल्यावर लोकेंद्र त्या तिघांना गाडीतून जयपूरला घेऊन गेला आणि तिथे लेखी परीक्षा घेतली. नैतिक आणि नेहा यांना निकालात चांगले गुण मिळाले. तिघेही लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले पण शारीरिक चाचणीत अनुत्तीर्ण झाले, त्यामुळे त्यांची अंतिम यादीत निवड झाली नाही. तिघांनाही गेल्या वर्षी अटक करण्यात आली.
या प्रकरणात कुंदन कुमार पंड्याला जून 2025 मध्ये अटक करण्यात आली. तो एका सरकारी शाळेत ग्रेड 3 शिक्षक म्हणून कार्यरत होता. असा आरोप आहे की तो 10 सप्टेंबर, 2021 रोजी बाबूलाल कटारा यांच्या घरी गेला आणि 50 लाख रुपये देऊन प्रश्नपत्रिका मिळवल्या. वृत्तानुसार, त्यावेळी कटारा दम्यावर आयुर्वेदिक औषधांनी उपचार घेत होते आणि कुंदन त्याच निमित्ताने त्यांच्याकडे गेला होता. तिथेच प्रश्नपत्रिकांचा सौदा ठरला आणि त्याने परीक्षेच्या तिन्ही दिवसांच्या प्रश्नपत्रिका मिळवल्या. एसआय भरती परीक्षा 2021 पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एकूण 142 जणांना अटक करण्यात आली आहे. ही भरती परीक्षा रद्द करण्यात आली असून आता ती 20 सप्टेंबर रोजी पुन्हा आयोजित केली जाणार आहे.
एसओजी या प्रकरणात राजस्थान लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य बाबूलाल कटारा, त्यांचा पुतण्या विजय दामोर आणि कुख्यात पेपर माफिया अनिल उर्फ शेर सिंग मीना यांना अटक केली आहे. एसओजीच्या तपासात समोर आले कि कृषी विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका थेट आरपीएससीमधूनच फुटली होती.
तत्कालीन आरपीएससी सदस्य बाबूलाल कटारा यांनी 60 लाख रुपयांच्या मोबदल्यात ही प्रश्नपत्रिका पेपर माफिया अनिल उर्फ शेर सिंग मीना याला दिली. कटारा यांनी ती प्रश्नपत्रिका त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणली, जिथे त्यांचा पुतण्या विजय दामोरने तिची नोंद एका रजिस्टरमध्ये केली आणि नंतर तीच प्रश्नपत्रिका माफियाला देण्यात आली.
*Devashish Govind Tokekar*
*INDIAN PRESS UNION*
*District Reporter*