June 10, 2026

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती कुक्कडगाव येथे उत्साहात साजर

बीड | प्रतिनिधी

पुण्यश्लोक राजमाता Ahilyabai Holkar यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त कुक्कडगाव (ता. बीड) येथे रविवारी, दि. ३१ मे २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिजाऊ चौक, माऊली नगर चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ध्वजारोहण करून राजमातांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात कुक्कडगावसह चव्हाणवाडी, खुंड्रस आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि समाजहितैषी कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजात एकता, सेवा आणि विकासाची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रशासनातील दूरदृष्टी, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि सामाजिक कार्यांचा उल्लेख केला. त्यांच्या आदर्श कारभारातून आजच्या समाजाने प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

जयंती सोहळ्यास यशवंत भाऊ कदम, कॅप्टन राजाभाऊ आठवले, दादासाहेब गांडगे, आत्माराम प्रभाळे, चंद्रकांत नवले, डॉ. मयूर कदम, महादेव गांडगे, रामेश्वर खंडागळे, ईश्वर खंडागळे तसेच परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थांनी त्यांच्या आदर्श कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

Written by

DEVASHISH GOVIND TOKEKAR TOKEKAR

District Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

INDIAN PRESS UNION

Indian Press Union (IPU) A National Platform for Journalists and Media Professionals.

© 2026 All Rights Reserved IPU MEDIA ASSOCIATION