बिलोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, येथील गांधी नगर भागातील विजय पटणे मेमोरियल स्कूलने यंदाही १०० टक्के निकालाची नोंद केली आहे.
या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थिनी कु. जयश्री बालाजी बुद्धेवाड हिने ९५.६० टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच तिने बिलोली तालुक्यात संयुक्तरीत्या द्वितीय क्रमांक मिळवल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली. तिच्या पाठोपाठ कु. अश्विनी संजय शेट्टिवार हिने ९२ टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. विराट राजेंद्र कुडकेकर याने ९१.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.
विद्यालयातून यावर्षी एकूण ४८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत यश मिळवले, तर १६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि ९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण केली.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई पटने, सचिव चंद्रशेखर पाटील, सहसचिव जयमाला पटने, मुख्याध्यापक गंगुलवार सर तसेच शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.